मुंबई : 2017 मध्ये 'हिंदी मीडियम' सिनेमानंतर अभिनेता इरफान खान पुन्हा एकदा भाषेचं महत्व पटवताना दिसत आहे. इरफान खानचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मीडियम'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. होमी अदजानियाने दिग्दर्शित केलं असून हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी रिलीज केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यमवर्गीय कुटुंब, मुलीच्या शिक्षणाकरता धडपड करणारा बाप, परदेशात मुलीला शिकवायचं ही इच्छा उराशी बाळगणारा हा बाप इरफान खान यांनी साकारला आहे. हा बाप लेकीसाठी नेमकं काय काय करतो? हे या सिनेमातून दाखवण्यात येत आहे. कॉमेडीसोबतच इमोशनचा परफेक्ट तडका या सिनेमात आपल्याला पाहायला मिळत आहे. इरफानच्या मुलीची भूमिका राधिका मदान करत आहे. (Angrezi Medium सिनेमाकरता इरफान खानचा भावूक मॅसेज) 


 



बुधवारी या सिनेमाचा एक वॉइस ओव्हर व्हिडिओ समोर आला होता. यामधून इरफान खानने आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं आहे. या व्हिडिओमार्फत त्याने चाहत्यांशी संवाद साधला आहे. 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा  सुपरहिट सिनेमा 'हिंदी मीडियम'चा सीक्वल आहे. तसेच हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या शुटिंगप्रमाणेच याचं प्रमोशन देखील इरफानला करायचं होतं. पण तब्बेतीच्या कारणामुळे ते शक्य होत नसल्याचं या व्हिडिओत म्हटलं आहे.


त्यामध्ये करिना कपूर, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी, दीपक डोबरियाल, डिंपल कपाडिया, किकू शारदा सारखे कलाकार या सिनेमात आहेत. या व्हिडिओ इरफान आपल्या आजारपणाबद्दलही बोलत आहे. पाहा काय आहे इरफान खानचा मॅसेज? आपल्याला माहितच आहे, इरफान खान गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरशी दोन हात करत आहे. तब्बेतीत फार सुधारणा न झाल्यामुळे सिनेमाच्या प्रमोशन करता हा पर्याय स्विकारला आहे.