मुंबई : टीव्ही सिरीअल 'भाभी जी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदे लवकरच राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस 11' ची विजेता शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकते. शिल्पा शिंदे निवडणूक देखील लढवू शकते अशी चर्चा आहे. काँग्रेसचे प्रवक्ते चरण सिंह सापरा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, शिल्पा शिंदे आज काँग्रेस पक्षात प्रवेस करणार आहे. शिल्पा शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार का याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. शिल्पा शिंदे आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार करताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री शिल्पा शिंदेने 1999 मध्ये आपल्या टीव्ही करिअरला सुरुवात केली. भाभी जी घर पर है या मालिकेत शिल्पाने अंगूरी भाभीची भूमिका केली आहे. 2016 मध्ये शिल्पाने हा शो सोड़ला होता. ऑक्टोबर 2017 मध्ये शिल्पा शिंदेने रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 11 मध्ये भाग घेतला होता. 14 जानेवारी 2018 ला ती बिग बॉस विजेती ठरली होती. 


शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 ला महाराष्ट्रात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. शिल्पाचे वडील डॉ सत्यदेव शिंदे हायकोर्टात जज होते. शिल्पा शिंदेला 2 मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. मुंबईच्या के.सी. कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतलं आहे.