मुंबई : दिवाळीनिमित्त बॉलिवूड सेलिब्रिटींचाही जोरदार उत्साह पहायला मिळत आहे. अभिनेता अनिल कपूरने दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं. सैफ अली खान, करिना कपूर, करिश्मा कपूर, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर इशान खट्टरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यावेळी एकसाथ दिसून आले. वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालह पार्टीत हजर होता. शाहरुख खानची देखील विशेष उपस्थिती होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने देखील दिवाळीच्या निमित्ताने पूजा आयोजित केली होती. या पूजेदेखील बॉलिवूड कलाकारांनी खास उपस्थिती लावली. यावेळी कार्तिक आर्यन, अर्जून कपूर, सारा अली खान, नेहा धूपिया, भूमि पेडणेकर, विक्की कौशल, वरूण धवन आणि जान्हवी कपूर कलाकार उपस्थित होते. 



यावेळी सगळे कलाकार अगदी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. अभिनेत्यांनी यावेळी कुर्ता-पायजमा घातला होता. तर सारा अली खान यावेळी पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. जान्हवी कपूरने हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता. तसेच भूमि पेडणेकर, नेहा धूपिया आणि कियारा आडवाणीने सूट घातला होता. 






कलाकारांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतून त्यांचा दिवाळीचा उत्साह दिसत आहे.