तिचं लग्न झालंय पण ती माझ्या प्रेमात वेडी आहे; दुबईतील श्रीमंत महिलेसोबत अनिल कपूरचा लेक सिक्रेट रिलेशनशिपमध्ये?
Harshwadhan Kapoor Secret Relationship: अनिल कपूरच्या मुलानं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे ज्यात तो म्हणाला आहे की तो एका दुबईच्या श्रीमंत महिल्यासोबत सिक्रेट रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिचं लग्न झाले असून ती त्याच्या ठार प्रेमात आहे.
Harshwadhan Kapoor Secret Relationship With Rich Lady in Dubai: अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा सध्या अभिनयापासून दूर असला तरीसुद्धा सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या सिक्रेट रिलेशनशिपची. यावेळी तिच्या एक कमेंटमुळे सर्वत्र त्याच्या या सिक्रेट रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल माध्यमातून जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. वर म्हटल्याप्रमाणे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो त्यातून सध्या त्याच्या एका पोस्टनं सर्वांंचेच लक्ष वेधले आहे. सेलिब्रेटींचे आयुष्य म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे त्यांची लक्झरीयस लाईफस्टाईल. त्यामुळे त्यांच्या या हटके फॅशन आणि महागड्या कपड्यालत्यांची चर्चा जोरात सुरू असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे हर्षवर्धन कपूर याची. त्यानं त्याच्या इन्टाग्रामपेजवरून नवीन शूज खरेदी केले होते. ज्याबद्दल त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यावेळी त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आपण पाहू शकतो की त्याच्याकडे लक्झरी शूजचं कलेक्शन आहे. त्याचे हे शूज पाहून नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. यावेळी काहींना त्याला ट्रोलही केलं आहे. खरंतर कोणाकडे किती शूज आहेत आणि कोणाकडे किती महागडे शूज आहेत कोणाला याचे मोजमाप करणं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु काहींना मात्र हर्षवर्धनकडं असेलेले हे महागडे शूजचे कलेक्शन पाहून मात्र हेवा वाटू लागला आहे. परंतु त्यात काही नवीन नाही हा मानवी स्वभाव आहे. परंतु यावेळी त्याच्या या फोटोखाली नेटकऱ्यांनी गंभीर कमेंट्स केल्या आहेत. यावेळी एकानं केलेल्या कमेंटवरून हर्षवर्धननं नाराजी व्यक्त करत एक धक्कादायक खुलासाही केला आहे.
हेही वाचा - इरसालवाडीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी हार्दिक जोशीची आभार मानणारी पोस्ट
यावेळी त्याच्या या पोस्टखाली एकानं कमेंट केली होती की, ''या शूजचे पैसे नक्की कोण देत? अनिल कपूर की आनंद अहूजा?'' याचं एका युझरच्या कमेंट खाली हर्षवर्धननं कमेंट केली आहे की, ''दोघांपैकी कोणी नाही. मी दुबईतील एका श्रीमंत महिलेसोबत सिक्रेट रिलेशनशिपमध्ये आहे. तिचं लग्न झालं आहे. पण ती माझ्या प्रेमात वेडी आहे..'' सध्या त्याच्या या कमेंटमुळे सर्वत्रच चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे फॅन्सही रिएक्ट होऊ लागले आहेत.
''तिच माझ्या सर्व महागड्या वस्तूंचं बिल भरते. हे सिक्रेट आता तुम्हाला माहिती झालं आहे. कारण माझ्यासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहात. आता रात्री तुम्हाला शांत झोप लागले अशी आशा करतो. तुमच्याकडे आता मोठी माहिती आहे…'' असं तो पुढे म्हणाला आहे. 2016 साली त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.