मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या फन्ने खां च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आज आपल्याला अनिल कपूर एक स्टार म्हणून माहित आहे. पण करिअरच्या सुरुवातीला अनिल कपूर बॅकग्रॉऊंड डान्सर म्हणून काम करत होता. अनिल कपूरने मीका सिंग, बादशाह आणि सुनीधी चौहानसोबत रियालिटी शो 'फिर भी दिल है हिंदूस्तानी २' च्या सेटवर हजेरी लावली. त्यावेळेस त्याने आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळेस अनिल कपूर म्हणाला की, अनेक लोकांना हे माहित नाही की, मी १९७९-८० मध्ये बॅकग्रॉऊंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.



काही हिंदी, तेलगू आणि कन्नड सिनेनात लहान सहान भूमिका केल्यानंतर १९८३ मध्ये वो सात दिन या सिनेमातून अभिनेता म्हणून त्याने कामाला सुरुवात केली. 



पुढे तो म्हणाला की, अभिनयाचा कोर्स पूर्ण करुनही मला कोणतेही काम मिळत नव्हते. तेव्हा एक शो होता. ज्याचे शूटिंग परदेशात होणार होते. या शो मध्ये जरीना वहाबजी, पद्मिनी कपिला, हेमंत कुमार आणि नूतन हे कलाकार होते. त्यांना काही बॅकग्रॉऊंड डान्सरची गरज होती. तेव्हा मी ते काम केले आणि त्यावेळेस एका शो चे १५ पाऊंड मिळत होते. पण मी त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांनी मला कामाची संधी दिली.



अनिल कपूरच्या फन्ने खां सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय, राजकुमार राव यांसारखे कलाकार आहेत.