Ranbir Kapoor Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट भारता आधी अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ सगळ्यांनाच पाहायला मिळत आहे. अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'अ‍ॅनिमल' नं पहिल्याच शोमध्ये चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत 'अ‍ॅनिमल' चे 1154 शो झाले आहे. त्यातून चित्रपटानं 5.40 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटानं पहिल्याच शोमध्ये एक मिलियनपेक्षा दास्त कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, 'अ‍ॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती. तर 'अ‍ॅनिमल' नं एकाच दिवसात तब्बल 5.40 कोटींची कमाई केली आहे. भारतात हा चित्रपट पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. आता पर्यंत साढे सात लाख तिकिटं विकली आहेत. आता संपूर्ण दिवस बाकी आहे. अशात म्हटलं जात आहे की प्रदर्शनाच्या आधल्या दिवशी देखील आगाऊ बूकिंग खूप चांगली होती. अशात म्हटलं जातंय की रणबीर कपूरचा चित्रपट पहिल्या दिवशी 35-45 कोटी रुपये कमावत ओपनिंग करणार आहे. खरंतर, हा एक अंदाज लावण्यात आला आहे. खरं आकडे हे उद्या म्हणजेच 2 डिसेंबर रोजी आपल्याला कळेल. 


हेही वाचा : Animal: चार महिने सराव, 500 किलो वजन; रणबीरने चालवलेल्या मशीन गनची किंमत माहितीये का


दरम्यान, सेंसर बोर्डनं रणबीर कपूरच्या या चित्रपटाला 'अ‍ॅनिमल'ला 'A' सर्टिफिकेट मिळालं आहे. 'अ‍ॅनिमल' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. रणबीर कपूरचा या चित्रपटाचा लूक जेव्हा प्रदर्शित झाला होतो. तेव्हा सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदाना, अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. याच चित्रपटासोबत अभिनेता विकी कौशलचा सॅम बहादुर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन हे मेघना गुलजारनं केलं आहे. त्यामुळे आज हे दोन्ही चित्रपच बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.