Ranbir Kapoor Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण या चित्रपटातील डिलीट करण्यात आलेले सीन आहेत. संदीप रेड्डी वांगानं 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातून काही सीन्स डिलीट केले होते. त्यातील आणखी एक सीन हा सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी हे संदीप रेड्डी वांगावर संतापल्याचे पाहायला मिळत आहे. नक्की हा कोणता सीन आहे ज्यामुळे नेटकरी संतापले हे पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही सगळ्यांनी चित्रपटाच्या शेवटी क्लायमॅक्स सीन हा पाहिलाच असेल ज्यात रणबीर हा बॉबी देओलची फाईट असते. त्या फाईटमध्ये बॉबी त्याचा जीव गमावतो. त्यानंतरचा एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या सीनला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले की हा शेवटचा सीन चित्रपटात का दिसला नाही. यात रणबीर कपूर नशेत फ्लाइट कॉकपिटमध्ये जाण्याआधी आणखी एक ड्रिंक बनवतो. त्यानंतर तो कॉकपिटमध्ये असलेल्या पायलटच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला सीटवरून उठायला सांगतो. त्यानंतर पायलटच्या सीटवर बसलेला रणबीरच्या तोंडात सिगारेट असल्याचं दिसतं. या संपूर्ण सीनमध्ये एकही डायलॉग नाही तर भावना सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बॅकग्राऊंडला 'पापा मेरी जान' हे गाणं लावण्यात आलं आहे. खरंतर या संपूर्ण सीनमध्ये भावाला मारून आल्यानंतर रणबीरची जी परिस्थीती झाली त्याला किती दु:ख होतं आहे याविषयी स्पष्ट दिसून येत आहे. 



ही जी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याविषयी एक्स यूजरनं लिहिलं की या चित्रपटाचा मला दिग्दर्शकाचा कट व्हर्जन पाहायचा आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, फ्लाइटमधला हा सीन या चित्रपटाला एका वेगळ्या स्थराला घेऊन जाऊ शकत होता. असाच एक शॉट हा चित्रपटात आहे जेव्हा फ्लाइट ही एका डोंगराला धडक देणार असते आणि संपूर्ण स्टोरी ही वेगळ्या स्तरावर जाते. 


हेही वाचा : ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...


1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात एक मुलगा आणि त्याच्या वडिलांसोबत असलेलं त्याचं नातं पाहायला मिळत आहे. चित्रपटात रणबीरनं विजय ही भूमिका साकारली होती. तर एक मुलगा त्याच्या वडिलांच्या सुरक्षेसाठी तो काय काय करतो हे पाहायला मिळत आहे. मशीन गननं 200 लोकांना गोळ्या झाडत तो सगळ्यांना त्याच्या वडिलांपासून लांब ठेवतो. चित्रपटात तो सीन देखील दाखवण्यत आला आहे.