मुंबई : लॉक-अप टीव्ही शो स्टार आणि सोशल मीडिया सेन्सेशन अंजली अरोरा सध्या तिच्या लीक एमएमएसमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरही लोक अंजलीला या व्हिडिओसाठी प्रचंड ट्रोल करत आहेत. मात्र, एका मुलाखतीत अंजलीने हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी बोलताना ती भावूकही झाली. तसंच या घटनेमुळे तिच्या कुटुंबाचं मोठं नुकसान झाल्याचंही तिने सांगितलं. अंजलीचा बॉयफ्रेंड आकाश संसनवाल यानेही या लीक झालेल्या MMS व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सायबर सेलमध्ये आरोपींविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे.


अंजली अरोराचा बॉयफ्रेंड आकाश संसनवालचा तिच्या गर्लफ्रेंडला पूर्ण पाठिंबा आहे. त्याला या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे. अंजलीने त्याच्यापासून काहीही लपवलं नाही. अलीकडेच अंजली अरोराला आरजे सिद्धार्थ कन्ननने विचारलं होतं की, तिच्या नावाने लीक झालेल्या कथित एमएमएसबद्दल आकाश संसनवालला माहिती आहे का? त्याची प्रतिक्रिया काय होती?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आकाशने अंजलीला पूर्ण पाठिंबा दिला
या प्रश्नाला उत्तर देताना अंजली भावूक झाली. ती म्हणाली, 'काय चाललं आहे आणि काय कचरा नाही, याची सर्वांना माहिती आहे. पण जे माझे आहेत ते माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. अंजलीने पुढे सांगितलं की, आकाश, आई-वडील, भाऊ या सर्वांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. कारण हे सर्व आता सहन होत नाही. अंजलीने तिच्या बॉयफ्रेंडपासून काहीही लपवलेलं नाही आणि आकाशने तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे.