मुंबई : प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस असतो तो म्हणजे लग्न. त्यानंतर पतीसोबत नव्या आयुष्याची सुरूवात. लग्न आणि लग्नापुर्वी आणि  नंतरचे काही क्षण कोणतीही स्त्री विसरू शकत नाही. सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे आपण ते क्षण सर्वांसोबत शेअर करू शकतो. अभिनेत्री अंकिता लोखंडेचं नुकताचं लग्न झालं. अंकिताचे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत नव्या जीवन प्रवासाला सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिताने लग्न आणि लग्नापूर्वी झालेल्या सर्व विधींचे व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आता तिने  नव्या घरी गृहप्रवेश करताना व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये विकी आणि अंकितामध्ये असलेलं प्रेम दिसून येत आहे.  नव्या घरी गृहप्रवेश करत असताना विकी, अंकिताची ज्याप्रकारे काळजी घेत आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 



व्हिडीओ पोस्ट करत अंकिताने कॅप्शनमध्ये, 'विकी जैन आणि जैन कुटुंबासोबत नवी सुरूवात....' असं लिहिलं आहे. सध्या विकी आणि अंकिताच्या महत्त्वाच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


सांगायचं झालं तर, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं लग्न 14 डिसेंबर रोजी ग्रॅण्ड झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या संगीत, हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटोही खूप व्हायरल झाले होते आहेत. ज्यामध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे.