तब्बल २ वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलली अंकिता लोखंडे...
अभिनेत्री अंकिता लोखंडे मुंबईतील एका मोठ्या बिजनेसमॅनला विक्की जैनला डेट करत असल्याची चर्चा होती.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टी.व्ही. अभिनेत्री अंकिता लोखंडे मुंबईतील एका मोठ्या बिजनेसमॅनला विक्की जैनला डेट करत असल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी होळी सेलिब्रेशन पार्टीला एकत्र हजेरी लावल्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. त्यापूर्वी अंकिता लोखंडे अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अंकिता त्याबद्दल खुलेपणाने बोलली आहे.
काय म्हणाली अंकिता?
एकेकाळी सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे टी.व्ही. जगतातील बेस्ट कपल होते. दोघेही ६ वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होते. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार असे वाटत असतानाच दोघांचे ब्रेकअप झाले.
ब्रेकअपबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, ब्रेकअपमुळे माझ्या करिअरचे नुकसान झाले. तरी देखील काम आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोघांमधील ताळमेळ साधता यायला हवा. पण मला तो साधणे तेव्हा जमत नव्हते.
पण आता...
पुढे ती म्हणाली की, ब्रेकअपचा तुमच्यावर खूप परिणाम होतो. तुम्हाला कळतच नाही तुमच्यासोबत नक्की काय होत आहे. मात्र ही परिस्थिती तुम्हाला खंबीर बनवते. आता मला त्याचे काहीही वाटत नाही. जे काही झाले तेव्हा माझे कुटुंबिय, मित्रमंडळी माझ्यासोबत होते.
यावरुन ती सिंगल असल्याचे जाणवते
मी आता प्रिंस चार्मिंगची वाट पाहते आहे. पण मी मुद्दाम, जाणीवपूर्वक त्याचा शोध घेत नाही. मी आता या सगळ्याच्या पलिकडे गेली आहे. मला आयुष्यात काही बनण्यासाठी कोणाच्या साथीची गरज नाही, असे अंकिता म्हणाली. अंकिताच्या या वक्तव्यामुळे तरी ती सध्या कोणालाही डेट करत नसून सिंगल असल्याचे प्रतित होते.