मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच तिच्या 'पवित्र रिश्ता' या शोच्या सीझन 2 मध्ये दिसणार आहे. शोच्या पहिल्या सीझनमध्येही तिने काम केले होते. अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत 'पवित्र रिश्ता' मध्ये दिसली होती. या शोमध्ये दोघांनी मानव आणि अर्चनाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती, पण आता अभिनेता शाहीर शेख 'पवित्र रिश्ता 2' मध्ये सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पवित्र रिश्ता 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. या सगळ्यामध्ये आता अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना म्हटलं की, त्याचा आवाज आजही तिला आठवतो.'


अंकिता लोखंडेला 'पवित्र रिश्ता 2' मध्ये शाहीर शेखसोबत रोमँटिक सीन करताना आव्हानांचा सामना कसा केला, असे विचारण्यात आले. यावर अंकिता लोखंडे म्हणाली की, 'यात काही विशेष नाही. एक कलाकार म्हणून मी फक्त सुशांतसोबत काम केलेले नाही. मी इतरांबरोबरही काम केले आहे. आणि एक कलाकार म्हणून, जर कोणी मला रोमान्स करायला सांगितले तर मी ते खूप चांगले करेन.'


अंकिता लोखंडे पुढे म्हणाली की, 'आम्ही कलाकार आहोत, हे आमचे काम आहे. अर्थात, जेव्हा मी एखाद्याला माणूस म्हणून पाहते, तेव्हा मला सुरुवातीला थोडेसे वाटायचे, पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचत असे आणि अर्चना-मानव लिहिलेले पाहताच मला मानवमध्ये सुशांतचा आवाज ऐकू येत असे. कारण सुशांत कसा बोलणार हे मला माहित आहे.'


'पवित्र रिश्ता' चा पहिला सीझन 2009 साली आला होता. या शोचे दिग्दर्शन एकता कपूरने केले होते. 'पवित्र रिश्ता'ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी या शोमध्ये छोट्या पडद्यावर चांगली प्रसिद्धी मिळवली. एवढेच नाही तर 'पवित्र रिश्ता' च्या शूटिंग दरम्यान हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमातही पडले. मात्र, काही काळानंतर अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचे ब्रेकअप झाले.