Ankita lokhande oops moment during award show : 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) मालिकेतील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) फक्त छोट्या पडद्यासाठी मर्यादीत राहिली नाही, तर तिनं बॉलिवूडमध्ये देखील चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत स्वतःला सिद्ध करून दाखवलं. आता अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ती Oops मुव्हमेंटचा शिकार होता होता वाचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिताचा हा व्हिडीओ एका अवॉर्ड शोमधील आहे. यावेळी अंकिताला तिचा ड्रेस सांभाळणे कठीण झाले आहे. अंकिता तिच्या पतीसोबत आलिशान कारमधून खाली उतरताच पापाराझीं समोर तिला तिचा ड्रेस कॅरी करताना खूप त्रास झाला. आता अंकिता आणि विकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Ankita Lokhande Oops Moment)


पाहा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंकिताचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर कौनबोला बॉलिवूडनं शेअर केला आहे. अंकिता एका अवॉर्ड शोसाठी पोहोचली होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी अंकिताने हिरव्या रंगाचा सुंदर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. पण तिच्या ड्रेसचा गळा इतका खोल होता की त्यामुळे तिला गाडीतून खाली उतरण्यासाठी खूप धडपड करावी लागली. अंकिता गाडीतून खाली उतरताच तिच्या ड्रेसच्या मानेवर हात ठेवत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक लोक अंकिताला ट्रोल करत आहेत.


हेही वाचा : Video : पुन्हा एकदा Salman Khan रितेश देशमुख साठी लावणार बाजी!


अंकिताला oops मोमेन्ट पाहून नेटकरी अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, असे कपडे सांभाळले जात नसतील तर तुम्ही घालता कशाला? दुसरा नेटकरी म्हणाला, 'अंकिता लग्नानंतर बोल्ड झाली आहे'. अंकितानं गेल्या वर्षी 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्न केले होते. अलीकडेच या जोडप्यानं त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या आयुष्यातील खास क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.  (Ankita lokhande oops moment during award show coming out from her car with husband Vicky jain Video Viral)