Ankita Lokhande Pregnant Rumors: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील खूप अॅक्टिव्ह असते. तिचे फोटोही मोठ्या प्रणाणात व्हायरल होत असतात. अलीकडेच अंकिताचे काही एडिट केलेले फोटो माध्यमांवर फिरत आहेत. या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे गरोदर असल्याचे दिसत आहे.  यात तिचे बेबी बंपही दिसत आहे. त्यामुळं अंकिता लवकरच गुडन्यूज देणार का, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. यावर आता अंकिताची प्रतिक्रियाही आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून अंकिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अंकिता पती विकी जैन याच्यासोबत दिसत आहे. दोघेही फोटोशूट करताना दिसत आहेत. काही जणांनी याच फोटोंवरुन अंकिता गरोदर असल्याचा कयास बांधला आहे. मात्र, अंकिताने स्वतःच या फोटोंचे सत्य समोर आणले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्टपणे यावर भाष्य केले आहे. 


व्हायरल होत असलेल्या फोटोंवर अंकिता लोखंडे गरोदर असल्याचा चर्चा होत असताना तिने मात्र या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो कोणीतरी एडिट केले असल्याचंही तिने म्हटलं आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर स्पष्टपणे मांडलं आहे. अंकिता म्हणाली आहे की, मला वाटतं मी एकटीच अशी अभिनेत्री नाहीये जिच्यासोबत ही गोष्ट घडली आहे. जेव्हा तुम्ही सिंगल असतात तेव्हा लोक तुमच्या लग्नावर प्रश्न विचारतात आणि लग्न झाल्यानंतर मुलांबाबत प्रश्न विचारले जातात. तु प्रेग्नेंट आहेस का? असं विचारलं जाते. सोशल मीडियावर पण असं लिहलं जाते. 


अंकिता लोखंडे पुढे म्हणते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो मीदेखील बघितले आहेत. ते फेक आहेत. तसंच, माझ्यावर होणारे मीमदेखील मी बघितले आहे. पण या फोटोंमुळं आणि चर्चांमुळं मला काहीच फरक पडत नाही. मला वाईटदेखील वाटत नाही याउलट मला फार हसू येते. कारण असं करणाऱ्या लोकांकडे काहीच काम नसते का, असा विचार माझ्या मनात येतो. 


दरम्यान, अंकिताला आई होण्याबाबत कधी विचार केलाय का?, असा प्रश्न विचारला असता तिने त्यावर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. आई होण्याबाबत आम्ही आत्ताच कोणताही विचार केला नाहीये. जेव्हा होईल तेव्हा आम्हाला आनंदच होईल. हे सगळं काही नशिबावर अवलंबून आहे, असं अंकिताने म्हटलं आहे. 


अंकिता आणि बिझनेसमॅन विक्की जैन यांनी 2021मध्ये लग्नगाठ बांधली होती. झीटीव्ही वरील पवित्र रिश्ता या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर अंकिताने काही बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.