Ankita Lokhande Remembers Sushant Singh Rajput : छोट्या पडद्यावरील कॉन्ट्रोव्हर्सीएल शो म्हणजेच 'बिग बॉस 17' त्या शोमुळे सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या चांगलेच चर्चेत असतात. त्यातच अनेकदा अंकिता ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतविषयी बोलताना दिसते. सुशांत सिंह राजपुत हा अंकिताचा एक्स बॉयफ्रेंड होता. ते दोघे जवळपास सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यानंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र, अंकिता नेहमीच सुशांतसाठी उभी राहिली आहे. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अंकिता पुन्हा एकदा सुशांतविषयी बोलताना दिसली. अंकिता मुनाव्वर फारुकीसोबत सुशांत विषयी बोलाताना दिसली. तर यावेळी तिनं सांगितलं की त्याचा अखेरचा फोटो पाहून तिची परिस्थिती कशी झाली होती. 


सुशांतचा अखेरचा फोटो पाहून कोलमडली होती अंकिता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनाव्वर फारुकीसोबत बोलत असताना अंकिता लोखंडेनं सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर तिनं सुशांतच्या मृत्यूनंतरचा फोटो पाहिल्यानंतर तिची अवस्था कशी होती याविषयी सांगितले आहे. अंकिता सुरुवातीला त्याच्या निधनाविषयी बोलताना म्हणाली की 'जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं की सगळं संपलं. त्यानं अनेक चित्रपट केले आणि सगळं संपलं. त्याचा खूप वाईट असा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. माझे हात-पाय थंड पडत होते. असं वाटतं होतं की तो झोपतोय. मी फक्त त्या फोटोला पाहत राहिली आणि विचार करत होती की त्याच्या डोक्यात काय काय सुरु होतं. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरु असतील पण सगळं गायब झालं होतं. आता काहीच राहिलं नाही. आता ते फक्त एक शरीर राहिलं आहे.'



हेही वाचा : 'बॉलिवूडला मी परवडत नाही' म्हणणाऱ्या 'या' दाक्षिणात्य बालकलाकाराला तुम्ही ओळखलं 


पुढे जेव्हा मुनव्वरनं सुशांतच्या कुटुंबाविषयी विचारलं तेव्हा अंकिता म्हणाली की 'ते बिहारचे होते.' मुनाव्वर म्हणाला 'त्याचं कुटुंब बिहारमध्ये होतं?' अंकिता म्हणाली नाही, 'त्याची एक बहीण अमेरिकेत होती, दुसरी चंडीगढमध्ये आणि त्याचे वडील पटना आणि दिल्लीमध्ये होते. त्याच्या कुटुंबात सगळेच उच्च शिक्षीत होते. अंकितानं पुढे सुशांतविषयी सांगितलं की तो खूप हुशार होता. गणितं तो लगेच सोडवायचा. तो आयआयटीचा विद्यार्थी होता आणि भारतात त्याचा आयआयटीमध्ये 7 वा रॅंक होता.'