मुंबई : छोट्या पडद्यावर आपली जादू चालवल्यानंतर आता अभिनेत्री अकिंता लोखंडे मोठ्या रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज आहे. अंकिता ‘मणिकर्णिका’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड करिअरला सुरूवात करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमात ती एका मराठमोळ्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना बघायला मिळणार आहे.  


मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता तिच्या पहिल्याच सिनेमात अभिनेता वैभव तत्ववादी याच्यासोबत रोमान्स करणार आहे. संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात ‘चिमाजी अप्पा’ची भूमिका साकारली होती. वैभवने या सिनेमाशी जोडल्या गेल्याचा आनंद व्यक्त केलाय. तो म्हणाला की, या सिनेमातील त्याची भूमिका फारच इंटरेस्टींग आहे. त्यासोबतच त्याला यात रोमान्स आणि अ‍ॅक्शन ड्रामाचीही संधी मिळत आहे. 


या सिनेमात वैभव हा पूरण सिंह ही भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या सेनेत तो खूप विश्वासू माणूस होता. त्याने राणी लक्ष्मीबाईला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. वैभव म्हणाला की, सिनेमात अंकिता आणि त्याचा रोमान्स सुद्धा हायलाईट असेल.


या सिनेमात अभिनेत्री कंगना राणावत ही राणी लक्ष्मीबाईच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अंकिता ही झलकारीबाईच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. झलकारीबाई ही राणी लक्ष्मीबाईच्या खूप जवळची मानली जात होती.