मुंबई : क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (shahrukh khan) मोठा आर्थिक झटका बसला आहे. अहवालानुसार, प्रसिद्ध शिक्षण अॅप बयजुसने (byju's) शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये शाहरुख खानने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर अभिनेत्याने इंडस्ट्रीतील बॉलिवूड सेलेब्ससोबतची मैत्रीही कायम ठेवली. 


एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही बंद केले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तानुसार, बयजूसने ज्या सुपरस्टारसाठी आगाऊ बुकिंग केली होती त्यांच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत.


शाहरुख खानसाठी बयजूस हा सर्वात मोठा प्रायोजक होता. सोबतच तो ह्युंदाई, एलजी, दुबई टुरिझम आणि रिलायन्स जिओ सारख्या अनेक कंपन्यांचा चेहरा आहे. वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे की, बयजूस या अभिनेत्याला ब्रँड म्हणून वर्षाला 3-4 कोटी रुपये देते. शाहरुख खान 2017 पासून त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.


वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे की, बयजूसने शाहरुख खानच्या जाहिरातींना तूर्तास स्थगिती आणली आहे. आर्यनच्या अटकेनंतर सोशल मीडियावर कंपनीकडे याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. मिम्स देखील व्हायरल होत होते.


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) शुक्रवारी ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या कोर्टातून कोणताही दिलासा मिळाला नाही आणि न्यायालयाने आर्यन खानला जामीन देण्यास नकार दिला. आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. पण त्यांना जामीन मिळाला नाही.


आर्यनला मुंबईच्या आर्थर रोड सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. कारण 9 ऑक्टोबर हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे, त्यामुळे तो जामीन अर्ज दाखल करू शकणार नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कारागृहात आर्यनला कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. आर्यन खानचा जामीन तीन वेळा फेटाळण्यात आला आहे.