मुंबई : गायिका कनिका कपूर कोरोना व्हायरसमधून सावरत असतानाच आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीला या व्हायरसने विळखा घातल्याचं कळत आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते करिम मोरानी यांची मुलगी शजा मोानी हिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांशी संवाद साधताना खुद्द करिम यांनी याविषयीची माहिती दिली. सध्याच्या घडीला तिला जुहू येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शजा तेथील कोविड 19 कक्षात निरिक्षणाअंतर्गत आहे. 


कोरोना व्हाययरसचं लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी शजा ऑस्ट्रेलियाहून परतली होती. अवघ्या काही दिवसांपूर्वीच ती परदेशातून भारतात परतली होती. सध्याच्या घडीला तिच्यावर उपचार सुरु असून, येत्या काळात तिच्यास लवकर सुधारणा होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 



 


बॉलिवूड गायिक कनिका कपूर हिच्यामागोमाग आता शजालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे कलाविश्वापर्यंतही हा कोरोना पोहोचल्याची बाब आता समोर येत आहे. तिच्या प्रकृतीविषयीची अधिक माहिती प्रतिक्षेत आहे. दरम्यान, शजाचे वडील हे बॉलिवूडमधील नामवंत निर्माते आहेत. 'चेन्नई एक्स्प्रेस', 'दिलवाले', 'हॅप्पी न्यू इयर' अशा चित्रटांच्या निर्मितत त्यांचा हातभार आहे.