Emergency Film:  ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते. त्यांनी आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये अनेक आव्हानात्मक भुमिका साकारल्या आहेत ज्या गाजल्याही आहेत. त्यांनी हम आपके हे कौन, बेटा अश्या नव्वदच्या दशकातल्या लोकप्रिय सिनेमांतून विनोदी भुमिका केल्या ज्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या. सारांश, कर्मा, अ वेनस्ड अशा चित्रपटांतूनही त्यांनी महत्त्वपुर्ण भुमिका साकारल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच त्यांचा काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला जो प्रचंड गाजला. त्यात त्यांनी काश्मिरच्या पुष्कर नाथ पंडित यांची भुमिका निभावली होती. त्यांच्या अभिनयाचेही सगळीकडे कौतुक झाले. लवकरच त्यांचा इमर्जन्सी हा चित्रपट रिलिज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवरून त्यांचा चित्रपटाचा लुक प्रसिद्ध केला आहे. या चित्रपटात ते राजकीय नेते जी पी नारायण यांची भुमिका निभावणार आहेत. 


हा चित्रपट अनुपम खेर यांच्यासाठी आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. चित्रपटातल्या नव्या लुकसह ट्विटरवरून त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांचा इमर्जन्सी हा 527 वा चित्रपट असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 


अनुपम खेर हे दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते आहेत. त्यांनी विविध भाषिक चित्रपटांमध्ये भुमिका साकारल्या असून त्यात सर्वाधिक हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. ते स्वतः अकादमी-पुरस्कार विजेते असून त्यांचे नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले आहे. त्यांनी हॉलीवूडपटही साकारले आहेत. दहा वर्षांपुर्वी आलेला ऑस्कर विजेता चित्रपट सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुकमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका निभावली होती. यूएस शो न्यू अॅमस्टरडॅममध्ये देखील त्यांनी अभिनय केला आहे.