मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (aamir khan) याचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.चित्रपट रिलीज होण्याआधीच बॉयक़ॉट ट्रेंड करत असल्याने, या बॉयक़ॉटचा फटका बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून आला. आणि चित्रपट सपशेल अपयशी ठरला. दरम्यान अनेक अभिनेत्यांनी त्याच्या चित्रपटाला समर्थन दिले होते तर अनेकांनी त्यावर टीकाही केली होती. आता अशाच बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्याने 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटाच्या बॉयकॉटला आमिरलाचं जबाबदार ठरवलंय. हा अभिनेता कोण आहे व तो काय म्हणालाय ते जाणून घेऊयात.  
 
बॉक्स ऑफिसवर पडलेल्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे आमिर खान (aamir khan) चर्चेत आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने तब्बल 4 वर्षांनी पुनरागमन केले होते. मात्र त्याचे पुनरागमन प्रेक्षकांना फारसे आवडल्याचे दिसत नाहीए. या चित्रपटावर अनेक अभिनेते-अभिनेत्री प्रतिक्रिया देत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांनी बॉयकॉटवर आपले मत व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपम खेर (anupam kher) यांनी इंडिया टूडेशी बोलताना सांगितले की, "जर कोणाला वाटत असेल की त्यांनी बॉयकॉट ट्रेंड सुरू करावा, तर ते, ते करण्यास मोकळे आहेत. आता ट्विटरवर रोज नवनवीन ट्रेंड येत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच लाल सिंग चड्ढाच्या बॉयकॉट ट्रेंडला कुठेतरी आमिर खानच जबाबदार असल्याचे मोठं विधान त्यांनी केले आहे. 


दरम्यान आमिर खान सध्या 'लाल सिंह चड्ढा'च्या (Laal Singh Chaddha) फ्लॉपमुळे खुपचं चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही आहे. ओटीटीवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. मात्र नेटफ्लिक्सशी झालेली डील रद्द झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे हा आमिर खानला दुहेरी धक्का समजला जात आहे.