मुंबई : अभिनेता वरूण धवनने 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून ५ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एकापाठोपाठ केलेल्या हिंदी सिनेमातून सिनेमांपैकी कोणत्याच चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरलेला नाही. 


बॉलिवूड करिअर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरूण धवन हा प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा आहे. वरूण हा  उत्तम डान्सर आणि अभिनेता 
आहे. त्याने मोजक्याच पण विविध भूमिका करून इंड्स्ट्रीमध्ये आपले स्थान कमावले. आता त्याने मुंबईत आपले नवे घरदेखील घेतले आहे. 


वरूण धवनच्या घराची टूर  


अभिनेता वरूण धवन याने मुंबईत नवे घर घेतले आहे. या घरात नुकतीच छोटी पार्टी आणि पूजा झाली. त्यावेळचा खास फोटो आणि व्हिडियो अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केले.  


'तुलसी'च्या स्टाईलमध्ये घराची टूर  


काही वर्षांपूर्वी घराघरात पोहचलेल्या 'क्योंकी सास भी...' या मालिकेचे टायटल सॉंग लागल्यानंतर 'तुलसी' आपल्याला घराची आणि परिवारातील लोकांची ओळख करून देत होती. त्याच स्टाईलमध्ये वरूणने नव्या घराची ओळख करून दिली आहे.   



 


अनुपम खेर यांची खास पोस्ट  


अभिनेते अनुपम खेर  यांनी वरूणला लहानपणापासून पाहिले आहे. त्यानंतर आता त्याची बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रगती पाहिली आहे. त्यामुळे त्यांनी वरूणचे खास कौतुक केले आहे.  वरूणची आई लल्ली धवन यांनीच वरूणच्या नव्या घराचे इंटिरियर केले आहे.