मुंबई : माजी पंतप्रधान मनमोह सिंह यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर ' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला असून या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत आपल्याला अनुपम खेर दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या ट्रेलर अगोदरच याच्याशी संबंधीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होता. अनुपम खेर यांचा लूक अगदी मनमोहन सिंह यांच्यासारखा आहे. 


ट्रेलर पाहताच लक्षात येईल की सिनेमातील अनेक गोष्टी कलाकारांनी हुबेहुब पडद्यावर साकारल्या आहेत. अनुपम खेर यांनी हा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. 



अक्षय खन्ना या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहे.  या सिनेमात वॉईस मॉड्युलेशन टेक्नीक उत्तम प्रकारे वापरल्यामुळे कलाकारांचे आवाज अगदी हुबेहुब वाटत आहेत. 



भारतीय विश्लेषक संजय बारू यांनी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर, द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' हे पुस्तक लिहिलं आहे. 


हंसल मेहता यांनी या पुस्तकावर सिनेमा तयार केला असून याचं दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे.