Rupali Ganguly : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुपाली गांगुली ही 'अनुपमा' या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. रुपालीनं 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साहेब' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली आहे. तर त्या आधी 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेतून रुपाली मोनीषा म्हणून लोकप्रियता मिळाली होती. आता रुपाली अनुपमा होऊन सगळ्यांच्या मनावर राज्य करते. आता रुपालीच्या मानधनापासून तिच्या प्रॉपर्टीपर्यंत सगळ्यांच गोष्टींची चर्चा आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुली ही लोकप्रिय निर्माते आहेत. तर तिची आई रजनी प्लेबॅक सिंगर होत्या. अभिनय क्षेत्राशी जवळ असलेलं कुटुंब असल्यामुळे रुपालीला तिचं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावं लागलं नाही. 



काय केलंय शिक्षण ? 


रुपालीच्या शिक्षणाविषयी बोलायचं झालं तर तिनं हॉटेल मॅनेटमेंटमध्ये डिग्री घेतली आहे. त्यांच काळात तिच्यावर अभिनयाचं कॉलेजच्या दरम्यान नाटकांमध्ये भाग घेऊ लागली. खरंतर लहान असतानाच रुपालीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अनेक मालिका आणि जाहिरांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिची 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेतील मोनिषा ही भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. आजही अनेक लोक तिला त्या भूमिकेसाठी अनेक लोक ओळखतात. 


रुपालीनं तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. पण त्यानंतर तिला आता 'अनुपमा' मालिकेची ऑफर मिळाली आणि तिनं पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, रुपाली सुरुवातीला या मालिकेसाठी 30,000 ते 35,000 रुपये मानधन घ्यायची. त्यानंतर जशी मालिकेची लोकप्रियता वाढली तिनं एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये मानधन घेण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जातं. 


हेही वाचा : मौनी रॉयनं पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, 'या पेक्षा...'


रुपाली कामा व्यतिरिक्त एक बिझनेसवूमन देखील आहे. ईटाइन्स टीव्हीनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, रुपाली तिच्या वडिलांसोबत म्हणजेच अनिल गांगुली यांच्यासोबत मिळून एक अॅड एजन्सी चालवत होती. ही अॅड एजन्सी त्यांनी 2000 मध्ये सुरु केली होती. ही कंपनी चित्रपट आणि जाहिराती बनवते. रुपाली या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये पदार्पण केल्या