पडद्यावर सोज्वळ दिसणाऱ्या अनुपमाने बाथटबमध्ये रेकॉर्ड केलेला `तो` व्हिडिओ व्हायरल
सध्या `अनुपमा` (Anupama) या मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.
मुंबई : सध्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शोमध्ये तोषू अनुपमावर नाराज आहे आणि त्याला तिला धडा शिकवायचा आहे. त्यामागचं कारण म्हणजे किंजलला त्याच्या अफेअरचं सत्य सांगणं आहे. त्याचबरोबर, किंजल तोषूला माफ करणं तर दूरच राहिलं मात्र तिला त्याच्याशी बोलायचंही नाही.
या सगळ्यामध्ये अनुपमाने बाथटबमध्ये बसून असा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. जो सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली गांगुली बाथटबमध्ये बसून काहीतरी बोलत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केली आहे.
बाथरोब घातलेली दिसली
या व्हिडिओमध्ये अनुपमा पांढऱ्या रंगाचा बाथरोब परिधान करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुपमा तिचे केस मोकळे आणि गळ्यात मंगळसूत्र घालून, बाथटबमध्ये कपाळावर एक ठिपका ठेवून बसलेली दिसत आहे. बाथटबमधील अनुपमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये बाथटबमध्ये बसलेली अनुपमा कॅमेराकडे पाहून सर्वांना शांत राहण्यास सांगत आहे. यासोबत ती म्हणतेय की, फक्त पॉझिटीव्ह वाईब्स. अनुपमाने हा व्हिडिओ शेअर करताच अनेक सेलिब्रिटींनी तिच्या व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. ((Anupama recorded such a video sitting in the bathtub Anuj Kapadia will be shocked to see)
यापूर्वी अनुपमाने अनुज कपाडियासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अनुपमाने महाराष्ट्रीयन स्टाईलची साडी नेसली आहे. तर अनुज अमिताभ बच्चन यांच्या 'कुली' स्टाईलचा गेटअप करत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अनुपमाने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'मान डे मॉर्निंग ब्लूज...' अनुपमा आणि अनुज कपाडियाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. शोच्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे शोचा टीआरपीही जबरदस्त आहे.