मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना मुंबईतील बिल्डरने फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 40 लाखांकरता फसवल्याचं समजते. या प्रकरणी अनुराधा पौडवाल यांनी तक्रार दाखल केला आहे. हे प्रकरण विरार परिसरातील एका फ्लॅट खरेदीसंबंधित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराधा पौडवाल यांनी ही तक्रार अर्नाळा कोस्टल पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणी राजू सुलेरे आणि अविनाश धोले तसेच इतर 5 साथीदार असल्याचं समजलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा बिचजवळ या बिल्डर्सने अतिशय स्वस्त दरात फ्लॅट असल्याचा दावा केला. यामध्ये अनुराधा पौडवाल आणि इतर लोकांनी फ्लॅट बुक केले.


या बिल्डरांनी इमारतीमध्ये स्विमिंग पूल, जिम आणि एक पार्क असल्याच सांगितलं. नंतर असं लक्षात आलं की, खोटी सेल्स अॅग्रीमेंटकरून त्यांना हा एकच फ्लॅट अनेकांना विकला आहे. अनुराधा पौडवाल यांनी 2013 मध्ये हा फ्लॅट बुक केला होता. या प्रकरणात एजन्सी आमची पूर्ण मदत करत आहे.