मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप(Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. तापसी आणि अनुराग चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात होते. तेथेच त्यांची चौकशी करण्यात आली. आता याप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे अनुराग आणि तापसी यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होवू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी मागील मूळ कारण समोर आलं आहे. छापेमारीचं मुख्य कारण आ़हे, अनुराग कश्यपने प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक. अनुरागने 16 कोटी रूपये  घर खरेदी करण्यात गुंतवले आहेत. अनुरागने हे घर खरेदी करण्यासाठी रक्कम ज्या कंपनीद्वारे दिली होती. ती कंपनी आता बंद करण्यात आली आहे. 


त्याचप्रमाणे तापसीने तिच्या घराचं  इंटेरियर करण्यासाठी देखील यांच कंपनीमधून पैसे दिले होते.  त्यामुळे आता याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.  तब्बल 11 वर्षांनंतर आयकर विभागाला यासंबंधीत माहिती मिळाली आहे. दरम्यान, कंपनीचे फायदे लपविण्यासाठी कंपनी बंद केली गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. 



फॅंटम फिल्म्सशी संबंधित सर्व लोक आणि या कंपनीच्या खात्यातून भरलेल्या पेमेंटची चौकशी केली जात आहे.  याप्रकरणाची चौकशी आज देखील करण्यात येणार आहे. याशिवाय पुन्हा अधिक चौकशी करण्यासाठी आयकर विभागाची टीम अनुराग आणि तापसीच्या घराची पुन्हा चौकशी करू शकतात.