आलियाचा चित्रपट पाहिल्यानंतर रडू लागला अनुराग कश्यप; करण जोहरची स्तुती करत म्हणाला, `मी दोन वेळा...`
Anurag Kashyap on Karan Johar`s film : अनुराग कश्यपनं करण जोहरच्या `रॉकी और रानी की प्रेम कहानी` चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावरून अनुराग कश्यपला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.
Anurag Kashyap on Karan Johar's film : बॉलिवूड अभिनेता आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात चांगली कमाई केली आहे. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. चित्रपटाला संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींना आवडला नाही. या चित्रपटातील काही गोष्टी पाहून प्रेक्षकांना आश्चर्य देखील झाले. दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपनं या चित्रपटावर रिव्ह्यू दिला आहे. हा चित्रपट पाहून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
अनुराग कश्यप यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' वर पोस्ट शेअर करत त्यानं करण जोहरची स्तुती करत हा त्याचा आजपर्यंतचा सगळ्यात चांगला चित्रपट असल्याचे म्हटले. त्यानंतर अनुराग कश्यपला यावरून अनेकांनी ट्रोल केले. ते पाहचा अनुराग कश्यप शांत राहिली नाही त्यांनी ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी अनुराग कश्यप यांना ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला होता की RARKPK पाहिल्यानंतर तू डोळे साफ करण्यासाठी 'ओपेनहाइमर' पाहण्याची गरज आहे.
अनुराग या प्रश्नावर उत्तर देत ट्रोलरला म्हणाला की 'दोघांचे तिकिट दाखव? ट्रोल. पुढे करण जोहरची स्तुती करत म्हणाला की मी ज्या करण जोहरला ओळखतो, त्यानं ते पूर्णपणे या चित्रपटात दाखवून दिलं आहे.' अनुराग या चित्रपटाविषयी पुढे बोलताना म्हणाला की चित्रपटातली सगळ्यात जास्त चांगली गोष्ट म्हणजे धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांची वन-साइडेड लव्ह स्टोरी तर दुसरीकडे जया बच्चन यांचं रागिट रुप. याशिवाय इतर कलाकार हे खूप चांगले आहेत. जुन्या क्लासिक गाण्यांविषयी बोलायचे झाले तर ते देखील अप्रतिम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय अनुराग कश्यपनं पुढे चित्रपटातील संपूर्ण कास्ट चांगलं असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : 'प्रत्येक महिलेला...', हेमा मालिनी यांनीच सांगितलं धर्मेंद्र यांच्यासोबत न राहण्यामागचं कारण
दरम्यान, चित्रपटाविषयी आणखी पुढे बोलत असताना म्हणाला 'चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मी हसलो आणि रडलो पण आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा पण हा चित्रपट मी दोनवेळा पाहिला. हा एक असा हिंदी चित्रपट आहे, ज्याची गेल्या अधिक काळापासून प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. ज्या करणला मी ओळखतो त्याला मी या चित्रपटातं पाहिलं.