अनुरागने पोलिसांना चौकशी दरम्यान अशी दिली उत्तरं
पायलच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांकडून अनुरागची चौकशी
मुंबई : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला. तिच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांकडून अनुरागची चौकशी झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुरागला पोलिसांनी मुंबईबाहेर न जाण्याचे आवाहन केलंय. हा तपास सुरु असताना पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आलं.
अनुरागने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी पायलला फक्त प्रोफेशनली ओळखतो. बराच काळ पायलशी माझं बोलण झाल नाही किंवा भेटही झाली नाही.
माझ्या वर्सोवातील घरात तिच्याशी भेट झाली नाही किंवा मी तिचे लैंगिक शोषण देखील केले नाही. पायलने माझ्याविरोधात केलेले आरोप ऐकून मीच आश्चर्यचकीत झालो. हे सर्व आरोप खोटे, निष्फळ आहेत. यात अजिबात सत्यता नाही. माझ्याविरोधात हे कटकारस्थान आहे. मी याप्रकरणात पूर्णपणे निर्दोष असल्याचे अनुरागने सांगितले.
हे आरोप खरे वाटल्यास मुंबई पोलीस अनुरागविरोधात कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करु शकतात. कलम ३७६ (I) म्हणजेच बलात्कारचा आरोप, ३५४ म्हणजे महीलांची मर्यादा भंग करण्यासाठी हल्ला करणे, ३४१ म्हणजे कोणत्याही महिलेला चुकीच्या पद्धतीने थांबवण आणि ३४२ म्हणजे कोणाला बंदी बनवण हे ३७६ नुसार अजामिनपत्र कलम आहेत.
६ वर्षानंतर आरोप
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झालीय. अभिनेत्री कंगना राणौतने अनुरागच्या अटकेची मागणी केलीय. अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती की त्यांनी यावर कारवाई करायला हवी. ज्यामुळे देशासमोर सत्य येईल. हे बोलणं माझ्यासाठी नुकसान देणार आहे. माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा असं तिने म्हटलंय. दरम्यान पायल घोष इतके दिवस गप्प का बसली ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
पायलचं स्पष्टीकरण
मी अनेकदा यासंदर्भात ट्वीट केलं आणि डिलीट केलं. ट्वीट डिलीट कर असे माझ्या मॅनेजरने भावाला सांगितले. हे सारे माझे हितचिंतक आहेत. माझी फॅमिली संकुचित आहे. ती मला सपोर्ट करणार नाही. हे सर्व सोड आणि घरी चल असे ते म्हणतील. पण अनुरागने मला सॉरी म्हटलं असत तर बरं झालं असतं.
कोणाची हिम्मत होत नाही हे बोलण्याची. मला हे बोलायला ६ वर्ष लागली. बॉलीवुडमध्ये सर्वजण वाईट नसतात. सर्वजण ड्रग्ज घेतात असं नाही पण कोणीच ड्रग्ज घेत नाही असेही नाही.