मुंबई : प्रेम व्यक्त करण्यासाठी जेव्हा कोणाचीही तमा बाळगली जात नाही, तेव्हाच प्रेमाची खरी परिभाषा पटवून सांगितली जाते. एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या मुलीनं तिच्या प्रेमाची अशीच परिभाषा सर्वांसमोर आणली आहे. प्रियकरासोबतच्या नात्याला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तिनं एक पोस्ट लिहिली. (Anurag Kashyaps daughter Aaliyah Kashyap shares a passionate kiss with boyfriend celebrates second anniversary)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं मनातील भावना व्यक्त करुन दिल्या आणि त्याच्यासोबतचे काही फोटोही शेअर केले. 'माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम दोन वर्षे.... तीसुद्धा माझा खास मित्र आणि जोडीदाराच्या साथीनं. या दिवसाच्या शुभेच्छा, मी तुझ्यावर खूप सारं प्रेम करते' असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलं. 


आलियानं प्रियकर शेन याच्यासोबतचे काही खास आणि इंटिमेट फोटोही शेअर केले. प्रेमाचं नातं एका वळणावर एकमेकांचा वेडेपणाही झेलण्याची ताकद देतं, हेच आलियानं शेअर केलेले फोटो पाहून लक्षात येत आहे. 



नात्याचे विविध पैलू तिच्या या पोस्टच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी, की स्टारकिड असूनही आलिया तिच्या आणि शेनच्या नात्याला कधच लपनवून ठेवताना दिसत नाही. उलटपक्षी वेळोवेळी ती या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसते.