मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरून अनेक नवे वाद समोर येत आहेत. आता या वादामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने उडी मारली आहे. कंगना आणि माझ्यात अत्यंत चांगली मैत्री होती, परंतु तिचे सध्याचे रूप पाहून मी थक्क आहे. मी या नव्या कंगनाला ओळखत नाही. असं वक्तव्य करत कश्यपने कंगनावर टीका केली. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने  बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाना साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या या वृत्तीला आता अनुरागने देखील विरोध नोंदवला आहे. त्याने सोशल मीडियावर कंगनाचा एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'ऐके काळी कंगना माझी खास मैत्रीण होती. मला प्रोत्साहन द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. तिची मुलाखत पाहून मला धक्काच बसला.' असं लिहिलं आहे.



अनुरागने शेअर केलेला हा व्हिडिओ कंगना रानौत स्टारर 'मणिकर्णिका' चित्रपट प्रदिर्शित झाल्या नंतरचा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय अनुगारने तिच्या चाहत्यांना कंगनालाना डोक्यावर न घेता तिला आरसा दाखवण्याचा सल्ला दिला आहे. 



तो म्हणाला, 'कंगनाच्या चाहत्यांनी तिला डोक्यावर न घेता तिला आरसा दाखवायला हवा. ती सध्या काहीही बोलत आहे. तिच्या बोलण्यामध्ये काही सत्य नाही. मी खऱ्या कंगनाला फार चांगलं ओळखतो  त्यामुळे या नव्या कंगनाकडे मला आता पाहवत नाही.' अनुरागचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे.