Anurag Warlikar Engagement Photos: मराठी कलाकारांच्या लग्नाची अथवा साखरपुड्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना दिसते आहे. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे. त्यानं बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. अनेक मराठी मालिका, चित्रपटांतून त्यानं अभिनय केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी मराठी' वाहिनीवरील 'दे धमाल' मालिकेतील त्याच्या गोड अभिनयानं सर्वांचीच मनं ही जिंकून घेतली होती. 'देवकी' या मराठी चित्रपटातूनही तो बालकलाकार म्हणून दिसला होता. अनेक मराठी चित्रपटांतून त्यानं अभिनय केला आहे. 2014 साली आलेल्या मनवा नाईकच्या 'पोरबाजार' या मराठी चित्रपटातूनही त्यानं लोकप्रिय भुमिका साकारली होती. सध्या तो मराठी मालिकांमध्ये झळकतो आहे. नुकताच तो 'डॉक्टर डॉन' या मालिकेत दिसला होता. 


अभिनेता अनुराग वरळीकर याचा 18 नोव्हेंबर रोजी साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यानं जोडीदार पायल साळवीशी साखरपुडा केला. याचा फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्समधून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावेळी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या कमेंटनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या फोटोखाली स्पृहा कमेंट करत म्हणाली की, ''सुराला कच्चा आहे... पण मुलगा चांगला आहे. अभिनदंन''. स्पृहा जोशी आणि अनुराग वरळीकर यांनी एकत्र 'दे धमाल' या मालिकेत एकत्र काम केले होते. तेव्हा ते दोघं खूपच लहान होते. ही मालिका 2002 दरम्यान आली होती. 


हेही वाचा : VIDEO: एक बाईक आणि काम फत्ते! शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; क्षणात तलावातलं पाणी पोहचवलं शेतात...


त्या दोघांनी एक जाहिरातही एकत्र केली होती. ही जाहिरात होती एका मॅट्रोमोनी साईटची. ज्यात ते दोघं गाताना दिसतात परंतु अनुरागला नीट गाता येत नाही मग ते दोघंही मिळून गातात आणि स्पृहाचे वडील अनुरागकडे पाहून म्हणतात की ''हा सुराला कच्चा आहे पण मुलगा चांगला आहे.'' हीच कमेंट स्पृहानंही त्याच्या फोटोखाली केली आहे. 



या जाहिरातीचा व्हिडीओ हा स्पृहानं शेअर केला होता. ज्यात तिनं लिहिलं होतं की, ''अनुरागसोबत माझी नवी जाहिरात. ऑलमोस्ट 16 वर्षांपुर्वी 'दे धमाल' मालिकेत एकत्र काम केलं होतं. मुलगा चांगला आहे.''