सिद्धार्थ माल्यासोबत दिसली `ही` मराठमोळी अभिनेत्री!
सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टीव्ह असलेली अभिनेत्री अनुषा दांडेकरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टीव्ह असलेली अभिनेत्री अनुषा दांडेकरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ती चर्चेत आली असून ट्रोलर्सनेही तिच्यावर निशाणा साधला आहे. या फोटोत तसं काय खास आहे? हा प्रश्न तुम्हाला पडता असेल. तर या फोटोत अनुषा कर्जबुडव्या विजय माल्याच्या मुलासोबत दिसत आहे.
हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, जेव्हा दोन मित्र पुन्हा भेटतात. तेव्हा असं वाटतं की कधी वेगळेच झालो नव्हतो, लव्ह यू सिद्धार्थ.
चाहते नाराज
एकमेकांना भेटून सिद्धार्थ-अनुषाला भलताच आनंद झाल्याचे फोटोतून दिसते. जुन्या मित्राच्या भेटीने अनुषा खूप खुश असली तरी तिचे चाहते मात्र तिच्यावर नाराज झाले आहेत. या फोटोवरुन अनुषाला जबरदस्त ट्रोल करण्यात आले.
एक फॅनने लिहिले, मी तुला आता अनफॉ़लो करत आहे. कारण मला वाटले तू एक चांगली सेलिब्रेटी आहेस. पण मी चुकीचा होतो. जो देशाचा नाही तो कोणाचाच नाही. हे खूप चुकीचे आहे. यावर अनुषाने उत्तरही दिले. तिने लिहिले की, मी हे नाही बोलत की, कोणी आरोपी किंवा निर्दोष आहे. पण इतकं नक्कीच सांगू इच्छिते की, जोपर्यंत तुम्हाला ते कसे आहेत किंवा त्यांची कहाणी काय आहे, हे ठाऊक नाही तोपर्यंत त्यांच्यावर टीका, कमेंट करु नका.
सिद्धार्थ अनुषाला 'या' नावाने संबोधतो
अनुषा गेल्या २ वर्षापासून करण कुंद्राला डेट करत आहे. दोघेही सध्या लव स्कूल सीजन 3 चे होस्टिंग करत आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, फक्त अनुषाच नाही तर सिद्धार्थने देखील हा फोटो इंस्टावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, तुला बघून खूप खुश झालो नाला...