मुंबई : नुकतेच विवाहबंधनात अडकलेले कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा मधुचंद्र साजरा करतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने फेसबुक अकाऊंटवरुन हनीमूनचा पहिला फोटो शेअर केलाय. विराट आणि अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे स्नोफॉल झालेला पाहायला मिळतोय.


हा फोटो शेअर करताना अनुष्काने स्वर्गात आल्याचा भास होतोय  असं म्हटलंय. ११ डिसेंबरला हे जोडपं विवाहबद्ध झालंय. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.



या दोघांच्या लग्नाबाबत मोठा सस्पेंस होता. सोमवारी ११ डिसेंबरला रात्री ९ वाजता अनुष्का आणि विराटने आपल्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि हा सस्पेंस संपवला.