मुंबई : काही दिवसांपासून वरूण - अनुष्का आपल्या आगामी सिनेमा 'सुई - धागा'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. मात्र या बिझी शेड्युलमधून दोघांनीही गणपती बाप्पासाठी वेळ काढला आहे. एवढंच काय तर त्यांनी इकोफ्रेंडली गणपती विराजमान केला आहे. वरूण धवनने सांगितलं की, त्याचा बाप्पा हा माती आणि धाग्यापासून बनला आहे. ही मूर्ती अतिशय लोभस आणि सुंदर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने सांगितलं की, कलाकार अभिषेक सावंत यांच्या क्रिएटिव्हीतून ही मूर्ती साकारली आहे. दोघांनी देखील आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही रंगीबेरंगी मूर्ती शेअर केली आहे. अनुष्काने यावर आशा व्यक्त केली आहे की, आपण अशा पद्धतीने इकोफ्रेंडली गणपती साजरा करून सगळ्या जीव जंतूना चांगल वातावरण देऊ. 



पुढे अनुष्का सांगते की, आपण गणरायाची पूजा करायला हवी कारण गणपती बाप्पा पर्यावरणाचा रक्षक आहे. गणरायाच्या हत्तीच्या चेहऱ्यातून आपल्याला जंगल वाचवण्याचा उपदेश देतात. तर बाप्पाला जो दूर्वा अर्पण करतो त्यातून हिरवळ राहावी याचा संदेश देतात. या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत.