मुंबई : श्रीदेवी यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकाचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवू़डची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचं शनिवारी दुबईमध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक अभिनेते - अभिनेत्रींनी आपापले कार्यक्रम रद्द केलेत. 


श्रीदेवी यांना आदरांजली देत 'परी' या आगामी सिनेमाच्या प्रोड्युसर्सनंही स्पेशल स्क्रिनिंग रद्द केलीय. 


अनुष्का शर्मा हिचा 'परी' हा सिनेमा २ मार्च रोजी प्रदर्शित होणा्र आहे... आणि आज या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, सिनेसृष्टीनं आपली 'चांदनी' गमावल्यानंतर क्रिअर्ज एन्टरटेन्मेंटनं आपल्या सिनेमाचं स्क्रिनिंग रद्द केल्याची घोषणा केलीय. 


'श्रीदेवी यांच्या अचानक निघून जाण्यानं आम्ही धक्क्यात आहोत...' असं सिनेमाची प्रोड्युसर प्रेरणा अरोडा यांनी म्हटलंय. 


'परी' या सिनेमात अनुष्का एका वेगळ्या पण भयानक अवतारात दिसणार आहे.