मुंबई : सिनेसृष्टीत अनेकदा एकमेकांची कॉपी केली जाते. अनेक तामिळ किंवा साऊथ सिनेमे बॉलिवूडमध्ये डब केले जातात. तर आता मराठी सिनेमांचा देखील रिमेक हिंदीत झाल्याचं आपण पाहिलं. मराठी सिनेमा आता जागतिक स्तरावर लक्षवेधी ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का - वरूण धवनच्या 'सुई-धागा' या सिनेमाची खूप चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ही चर्चा कधी त्या सिनेमातील क्रिएटिव गोष्टीबाबत आहे तर कधी अनुष्काच्या 'ममता मिम्स'मुळे ती चर्चेत आली. सिनेमाची चर्चेमागे कधी गंभीर कारण होतं तर कधी मजेशीर... या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनुष्काच्या ‘ममता मिम्सचा सिलसिला’ हा प्रमोशनपर्यंत चालू होता. अनुष्काच्या मिम्सचे प्रकरण आता कुठे थंडावले असताना ऐन प्रदर्शनाच्या दिवशीच अनुष्काच्या ममता भूमिकेशी संबंधित सोशल मिडीयावर आणखी एक खळबळ उडाली.



अनुष्काने तिच्या 'सुई-धागा' सिनेमातील ममता या कॅरेक्टरसाठी मराठी सिनेमातील अभिनेत्रीची कॉपी केल्याचं समोर आलं आहे. अनुष्काने रीना अग्रवालला कॉपी केल्याचं समोर आलं आहे. 'झाला बोभाटा' या मराठी सिनेमात रीना अग्रवाल या अभिनेत्रीचा लूक आणि 'सुई-धागा' सिनेमातील अनुष्काच्या लूक सारखाच असल्याचं समोर झालं आहे. आपण अनेकवेळा अनुभवलं आहे की, मराठी सिनेमातील अनेक कॅरेक्टर बॉलिवूडमध्ये कॉपी केले जातात. असंच काहीस अनुष्काच्या ममता कॅरेक्टरबद्दल झालं आहे.