Anushka Sharmaने दिलं होतं `3 इडियट्स`साठी ऑडिशन, पण...
सोशल मीडियावर अनुष्काचा व्हीडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कायम चर्चेत असते. अनुष्काचा जुना व्हीडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma)'3 इडियट्स' चित्रपटाचं ऑडिशन देताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हीडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये अनुष्का 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे.
ऑडिशनमध्ये अनुष्का बोलत असलेले डायलॉग चित्रपटात ग्रेसी सिंग बोलताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये ती तरूण दिसत आहे. तिने हिरवा टॅपमध्ये घातला आहे. अनुष्काच्या व्हीडिओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पण '3 इडियट्स' (3 Idiots)चित्रपटात अनुष्काचं सिलेक्शन झालं नव्हतं.
पण 5 वर्षांनंतर राजकुमार हिरानीने 'पीके' चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबक झळकली होती. चित्रपटात तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील मुख्य भूमिकेत झळकला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने उत्तम मजल मारली होती.
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अभिनेता शाहरूख खान स्टारर 'झिरो' चित्ररपटाच्या माध्यमातून चाहचत्यांच्या भेटीस आली होती. पण हा चित्र पट बॉक्क ऑफिसवर हवी तशी कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर अनुष्का शर्मा निर्मित 'पाताल लोक' ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजली.