मुंबई : अनुष्का शर्माला तिचे जुने दिवस आठवत आहेत. तिने इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. अनुष्काच्या या फोटोला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या चाहत्यांनीही या फोटोवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. सध्या ती न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच अनुष्काने तिच्या फॅमिलीसोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत.


आता अनुष्काने वामिकाच्या जन्मानंतर जीवनात झालेल्या बदलांबाबत सांगितलं आहे. तिने प्रेग्नेंसीपूर्वीचे काही खास क्षण शेअर केले आहेत.


अनुष्काच्या फोटोमध्ये दोन कॉफीचे कप दिसत आहेत. ती बागेत बसल्याचं दिसत आहे. आणि तिच्या चेहऱ्यावर निव्वळ आनंद दिसत आहे.


अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तेव्हाचा फोटो जेव्हा मी एक नाही, तर दोन कप कॉफी शांततेत पियू शकत होते आणि फोन देखील स्क्रोल करु शकत होते.



तिची अवस्था चाहत्यांना देखील समजू शकत आहेत. ते कमेंट करत अनुष्काला प्रतिक्रिया देत आहेत.