नवी दिल्ली : भारतातील सर्वात चर्चेत राहणा-या जोडीने गुपचूप लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया साऊथ आफ्रिका दौ-यावर असून विराटची टीम चांगलीच अडचणीत दिसत आहे. तर दुसरीकडे अनुष्का शर्मा भारतात आहे. पण ती जराही एकटी नाहीये. मिसेस कोहली एका व्यक्ती खाससोबत वेळ घालवत आहे. 


अनुष्कासोबत स्पेशल कोण?


अनुष्काने सोशल मीडियात एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एका खाससोबत वेळ घालवताना दिसत आहे. आणि याला तिने एक मजेदार कॅप्शनही दिलं आहे. 


विराट तिकडे ती इकडे...


विराट साऊथ आफ्रिका दौ-यासाठी जात असताना अनुष्काही काही दिवस त्याच्यासोबत गेली होती. त्यानंतर अनुष्का भारतात परत आली. सध्या ती शूटिंगमध्ये बिझी आहे. पण अनेकांना वाटत असेल की, विराट तिकडे अनुष्का इकडे...पण तसं नाहीये. 


हा आहे तो खास...


अनुष्काने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत ती तिच्या डॉगीसोबत दिसत आहे. आणि सुट्टीचा दिवस त्याच्यासोबत घालवत असल्याचे तिने सांगितले. 



अनुष्का शर्मा सध्या आनंद एल राय यांच्या सिनेमात काम करत आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या सिनेमात शाहरुख खान, कतरिना आणि अनुष्का दिसणार आहे.