मुंबई : विराट कोहली आणि अनुष्‍का शर्मा ही जोडी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक सामाजिक मुद्द्यावर दोघे जोडलेले असतात. दोघांनी फिट इंडिया चॅलेंज देखील स्विकारलं होतं. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाबाबत आता एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. विराट कोहलीने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पत्नी अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्य़ा एका कारमालकाला ओरडत आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की अनुष्का कारने जात असतांना पुढे असणाऱ्या एका कारमधून कचरा फेकणाऱ्या व्यक्तीला तिने पाहिलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने त्या कारला थांबवलं आणि कारमध्ये बसलेल्या लोकांवर चांगलीच भडकली. तिने कचरा डस्टबीनमध्ये टाकण्य़ाचा सल्ला दिला. जेव्हा अनुष्‍का त्यांना ही गोष्ट सांगत होती तेव्हा मागून हा व्हिडिओ काढला गेला. विराट कोहलीनेच कदाचित हा व्हिडिओ काढला असावा. हा व्हिडिओ शेअर करत विराटने म्हटलं की, 'या लोकांना रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर त्यांना योग्य प्रकारे समजवलं. महागड्या कारमध्ये प्रवास करतात पण यांची बुद्धी खराब आहे. अशी लोकं आपला देश स्वच्छ नाही ठेवू शकत का? जर तुम्ही देखील असं होतांना पाहिलं तर असंच करा. जनजागृती पसरवा.'



स्वच्छ भारत अभियानअंतर्गत मोदी सरकार एक मोठं अभियान चालवत आहे. पीएम मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या अभियानअंतर्गत जनजागृती पसरवत आहे. स्वत: विराट कोहली एकदा स्टेडियममध्ये रिकाम्या बाटल्या उचलतांना दिसला होता.