मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे मुलगी वामिकाच्या सुरक्षेबाबत खूप जास्त प्रोटेक्टिव आहेत. अनुष्का आणि विराटने आतापर्यंत आपल्या मुलीचा फोटो सगळ्यांपासून लपवला आहे. अजूनही वामिका मीडियाच्या झगमगटापासून दूर आहे. मीडियाचे फोटोग्राफर आणि पापाराझीने देखील वामिकाचा एकही फोटो कुठेही शेअर न केल्यामुळे आभार मानले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मीडियाचे आभार मानले आहेत. 



अनुष्का आपल्या पोस्टमध्ये म्हणते 



वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ प्रकाशित न केल्याबद्दल आम्ही भारतीय पापाराझी आणि मीडिया व्यक्तींचे आभारी आहोत. पालक म्हणून आमची विनंती आहे की, वामिकाचे एकही फोटो सोशल मीडियावर कुठेही पोस्ट करू नका. 


आम्हाला आमच्या मुलीसाठी प्रायव्हसी हवी आहे. वामिकाला मीडिया आणि सोशल मीडियापासून दूर ठेवून तिचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याची संधी देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. 



अनुष्काने पुढे लिहिले की, जेव्हा ती मोठी होईल, तेव्हा आम्ही तिला थांबवणार नाही. फॅन क्लब आणि इतर ठिकाणी फोटो पोस्ट न केलेल्या प्रत्येकाचे आभार. ही तुमच्या बाजूने खूप चांगली गोष्ट आहे. 


काही दिवसांपूर्वी विराट कोहली आपल्या भारतीय संघासोबत साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात होते. त्यावेळी त्याने मीडियाला,'बाळाचे फोटो काढू नका? ' असे सांगितले. मीडियाने आणि पापाराझीने त्याची गोष्ट ऐकल्यामुळे अऩुष्काने आभार मानले.