अनुष्का शर्माही `क्रिकेटच्या मैदानात`! झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सचा ट्रेन्ड पहायला मिळतोय.
मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सचा ट्रेन्ड पहायला मिळतोय. सायना नेहवाल, कपिल देवनंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामीवर सिनेमा येतोय.
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक बायोपिक्स आले, त्यातले अनेक चित्रपट हे खेळाडूंच्या आयुष्यावर बेतलेले आहेत. आता असाच एक सिनेमा येऊ घातलाय. महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामीच्या आयुष्यावर सिनेमा येतोय. या सिनेमात झुलुनची भूमिका कोण साकारणार याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र आता या विषयावरुन पडदा उठलाय.
अभिनेत्री अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. होय भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीची पत्नी झुलन गोस्वामीच्या रुपात दिसणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मानं २०१८साली आलेल्या झिरो या सिनेमानंतर कोणत्याही दुस-या सिनेमात काम केलं नाही.
एकूणच अनुष्का या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. कोलकात्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटींगच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्वत: झूलन गोस्वामीही उपस्थित होती. कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात या दोघी एकत्र दिसल्या.