मुंबई : ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीने अतिशय खराब कामगिरी केली. या कामगिरीचं खापर चाहत्यांनी अभिनेता अनुष्का शर्मावर फोडले आहे. शनिवारी सामन्यात अतिशय लाजीरवाणा विक्रम केल्यानंतर ट्विटवर अनुष्का शर्मा आणि तिच्या होणाऱ्या बाळाला ट्विटरवर ट्रोल करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी विराट कोहली आणि भारतीय संघाने अतिशय खराब प्रदर्शन केलं. या सामन्यात भारताच्या संघाने फक्त ३६ धावा करून संपूर्ण संघ बाद झाला. यावेळी चाहते अतिशय नाराज झाले. जगभरात यावर मीम्स तयार होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाले. 



अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.



कायमच भारतीय संघाचं पराजय हे अनुष्कामुळे असं चाहत्यांनी चित्र उभं केलंय. असं पहिल्यांदा घडलेलं नाही जेव्हा टीम इंडिया किंवा विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्समुळे अनुष्का शर्माला जबाबदार धरलं आहे. अनुष्काला या सामन्याकरता खूप ऐकवण्यात आलं होतं. विराट कोहलीने अनेकदा याला प्रत्युत्तर दिलं आहे.