देहरादून : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे इटलीत एका खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकले असले तरी त्यांचे अनेक नातेवाईक मात्र त्यांच्या या 'गुपचूप' विवाहसोहळ्यावर नाराज आहेत. त्यापैंकीच एक आहे अनुष्काची आजी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीच्या एका शानदार रिसॉर्टमध्ये अनुष्का - विराटनं आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्यात. दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या लग्नाची बातमी सर्वांना दिलीय. आपल्या या नाजुक क्षणांचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत होता.


पण, हा समारंभ इतक्या खाजगी पद्धतीत पार पाडला गेला की खुद्द अनुष्काच्या आजीलाही या विवाहाचा थांगपत्ता नव्हता. मीडियातूनच त्यांना अनुष्काच्या या 'खाजगी' विवाहसोहळ्याची बातमी समजली. राजधानी दूनच्या नेशविला रोडवर 'शीला भवन' नावाच्या एका पारंपरिक घरात अनुष्काची आजी, काका आणि काकू राहतात. 


हजारो कोसांवर आपल्या नातीनं लग्न केलं असलं आणि आपण त्यात सहभागी होऊ शकलो नाहीत याचं दु:ख असलं तरी अनुष्काची आजी आपल्या नातीचं आणि तिच्या पतीची आतुरतेनं वाट पाहत आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, अनुष्काच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबासह तिचे अध्यात्मिक गुरुही इटलीत दाखल झाले होते... पण, तिची आजी, काका, काकू यांना मात्र या सोहळ्याविषयी कुटुंबियांपैंकी कुणीही कल्पना दिली नव्हती.