मुंबई : चश्मा घातलेली, पांढऱ्या केसांची, म्हाताऱ्या आजीसारखी दिसणारी अनुष्का तुम्ही पाहिली का ? अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून तिच्या फॅन्सना धक्काच बसलाय. एवढच नव्हे तर विराट कोहलीही हा फोटो पाहून घाबरेल असं म्हटल जातय. या फोटोमध्ये ती म्हातारी दिसतेय. 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा फोटो 'सुई धागा' सिनेमातील किंवा कोणत्या जाहिरातीसाठी केला असावा असा अंदाज लावला जातोय. 

 


 

परी सिनेमातील आपल्या लूकने सर्वांना हैराण केल्यानंतर आता अनुष्काचा नवा लुक समोर आलाय.

 


'सुई धागा'मध्ये अनुष्का वरूण धवनसोबत दिसणार आहे. शरत कटारियाने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून मनीष शर्मा या सिनेमाचा निर्माता आहे. यशराज फिल्मच्या बॅनरमधील हा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.