मुंबई : पुन्हा एकदा बाहुबलीमधील अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा सिनेमा भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भागमती या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. भागमती हा तेलगु सिनेमा आहे. या सिनेमांत अनुष्का आयएएस ऑफिसरचे कॅरेक्टर प्ले करत आहे. या सिनेमांत ती गरिबांना सतत मदत करणारी आयएएस दाखवली आहे. मात्र काही कारणामुळे तीला जेलमध्ये जावं लागतं. तर ट्रेलरमध्ये तिच्या प्रेतात्माची सावली होती असं देखील दाखवण्यात आलं आहे. ज्याच्याशी ती भांडत असल्याचं दिसत आहे. 


सिनेमाचा ट्रेलर दमदार आहे. तसेच अनुष्काचा अभिनय देखील अतिशयय दमदार आहे. ट्रेलरमध्ये ती स्ततःच्या हाताला खिळा ठोकताना दिसत आहे भागमती हा सिनेमा जी. अशोक यांनी दिग्दर्शित केला आहे. अनुष्कासोबत या सिमेमात उन्नी मुकुंद आणि आदी पिनिसेट्टी, मलयालम अभिनेता जयराम देखील आहेत. हा सिनेमा तेलगु, तामिळ आणि मलयालम या तिन्ही भाषेत रिलिज होणार आहे. 



बाहुबली या सिनेमानंतर अनुष्का शेट्टी पहिल्यांदा स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहे. अनुष्का शेट्टीचा हा सिनेमा 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या दिवशी या सिनेमाला अक्षय कुमारच्या पॅडमॅन आणि संजय लीला भन्साळीच्या पद्मावत या सिनेमासोबत टक्कर होणार आहे.