मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. चाहते आणि मीडियापासून दूर जाऊन विरूष्का लग्नबंधनात अडकले. मात्र भारतात परतल्यानंतर दोघेही आपापल्या कामामध्ये व्यग्र झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर अनुष्का शर्मा निर्मित आणि अभिनित 'परी' हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. होळीच्या लॉग विकेंडला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटी आला असला तरीही तो बॉक्सऑफिसवर फार कमाल करू शकलेला नाही.बॉक्सऑफिसवर कमाल करू शकला नसला तरीही 'परी' या चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे. 


काय केली कमाल ? 


सध्या बॉलिवूड सिनेमे परदेशात रीलिज करण्याचा ट्रेड वाढला आहे. सलमान खान, आमिर खान पाठोपाठ आता अनुष्का शर्माचा चित्रपट साता समुद्रापार पोहचला आहे. अनुष्का शर्मा ही पहिली अभिनेत्री आहे, जिचा सिनेमा सातासमुद्रापार पोहचला आहे. 


परदेशात होणार रिलीज  


रूसमध्ये 'परी' रिलीज होणार आहे. परी हा थरारपट आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट सुपर नॅचरल थ्रिलर आहे.  


अनुष्काची ट्विटरच्या माध्यमातून माहिती 


अनुष्का शर्माने ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही बातमी दिली आहे. येत्या 19 एप्रिलला रशियामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. ही बातमी शेअर करताना आनंद होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


 



बॉक्सऑफिसवर कमाई  


बॉक्सऑफिसवर अनुष्काचा 'परी' फ्लॉप ठरला आहे. एकूण या चित्रपटाने सुमारे 23 कोटींची कमाई केली होती. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण  आदर्श  यांनी ट्विटरवर यावर्षी बॉक्स ऑफिसवर दमदार  कामगिरी करणार्‍या चित्रपटाचे कलेक्शन शेअर केले आहे.  


 



 प्रोसित रॉयचं दिग्दर्शन   


 'परी' या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्माने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय  यांचे आहे. अनुष्कासोबत या चित्रपटामध्ये परम्ब्रता चॅटर्जी, रिताभरी चक्रबर्ती, मानसी मुल्तानी, रजत कपूर झळकणार आहे.