मुंबई : अपर्णा बालामुरलीसोबत साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक अनोळखी व्यक्ती अपर्णाला छेडताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपर्णा बालमुरली तिच्या नवीन चित्रपट थंकमच्या प्रमोशनसाठी लॉ कॉलेजमध्ये पोहोचली होती त्यावेळी तिच्यासोबत विनीत श्रीनिवासनही उपस्थित होते. कॉलेजमधील एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने सर्वांसमोर असे कृत्य केले, केरळमधील लॉ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, कार्यक्रमादरम्यान अपर्णा खुर्चीवर बसलेली आहे. तेव्हाच तिच्या स्वागतासाठी एक विद्यार्थी मंचावर येतो. तो अपर्णाशी फोटो काढायला तिच्या जवळ जातो. आणि तो  तिला खुर्चीवरून उठवतो. यानंतर ती उठताच तो विद्यार्थी अपर्णाच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर तिच्या पाठीवर थाप मारण्यास सुरुवात करतो मात्र अपर्णाला विद्यार्थ्याचं हे कृत्य आवडत नाही आणि नंतर ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. यानंतर विद्यार्थ्याने हात जोडून अभिनेत्रीला सॉरीही म्हटलं आहे. 


अपर्णाच्या समर्थनात यूजर्स उतरले
कॉलेजच्या अधिकाऱ्यांपासून अनेक जण मंचावर बसलेले दिसत आहेत, मात्र अपर्णासोबतच्या विद्यार्थिनीच्या या गैरवर्तनावर कोणीही आक्षेप घेत नाही. सोशल मीडियावर युजर्स अभिनेत्री अपर्णा बालमुरलीच्या समर्थनात उतरले आहेत आणि ट्विट करून विद्यार्थ्याच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. 



थँकम चित्रपटाचे दिग्दर्शन साहीद अराफत यांनी केलं आहे. या चित्रपटात अपर्णा बालमुरली, विनीत श्रीनिवासन यांच्याशिवाय गिरीश कुलकर्णी आणि बिजू मेनन सारखे स्टार्स दिसणार आहेत. फहद फासिल या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. चित्रपटाचा बहुतांश भाग तमिळनाडूमध्ये शूट करण्यात आला आहे. 'Thankum' 26 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.