Apple चे सीईओ टीम कुक यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षीतसह मारला वडापाववर ताव
सध्या सगळीकडे चर्चा होतेय ती म्हणजे आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्या स्टोअरची. मंगळवारी भारतातील पहिल्या आयफोन कंपनीच्या स्टोअरचे उद्धाटनसोहळा पार पडणार आहे. BKC बिझनेस डिस्ट्रिक्ट येथे हा ग्रँण्ड सोहळा पार पडणार आहे.
मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा होतेय ती म्हणजे आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्या स्टोअरची. मंगळवारी भारतातील पहिल्या आयफोन कंपनीच्या स्टोअरचे उद्धाटनसोहळा पार पडणार आहे. BKC बिझनेस डिस्ट्रिक्ट येथे हा ग्रँण्ड सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आयफोनच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच असेल. या दिमाखदार सोहळ्यासाठी Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक स्वत: मुंबईत दाखल झाले आहेत.
भारतातील पहिल्या आयफोन कंपनीच्या स्टोअरची चर्चा एकीकडे सुरु असतानाच त्यांचा एक माधुरी दिक्षीतसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत दोघंही मुंबईचं प्रसिद्ध खाद्य वडापाववर ताव मारताना दिसत आहे. स्वत: माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. माधुरीने शेअर केलेल्या पोस्ट सोबतच तिने पोस्टला दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शेअर केलेल्या पोस्टला अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''मुंबईत स्वागत करण्याचा वडापावपेक्षा चांगला मार्ग नाही.'' असं कॅप्शन फोटो शेअर करत माधुरी दीक्षितने दिलं आहे.
तर तिच्या या पोस्टवर Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी रिप्लाय देत 'माझ्या पहिल्या वडापावसोबत ओळख करून देण्यासाठी धन्यवाद माधुकी दीक्षित, चव उत्तम होती.' असं ट्वीट केलं आहे. टीम कुक यांनी स्टोअरच उद्धाटन करण्यापूर्वी तेथील टीमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईचा फेरफटका मारत प्रसिद्ध मुंबई वडापाववर देखील ताव मारला.
अभिनेत्री माधुरी दीक्षित रविवारी मुंबईत एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाली होती. या अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये माधुरीने तिच्या 'तेजाब' चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावरही डान्स केला.
तर भारतातील पहिलं Apple Store मंगळवार, 18 एप्रिल 2023 रोजी मुंबईत सुरू होणार आहे. आणि अॅपलचे सीईओ टिम कुक या लॉन्चिंगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. या दौऱ्यासह टीम कूक बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. Apple भारतात 25 वर्षे साजरी करत आहे आणि या आठवड्यात कंपनी देशातील पहिले Apple Store उघडून मोठ्या विस्तारासाठी सज्ज आहे