Apurva Nemlekar Brother Death : छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून प्रकाश झोताता आलेली अभिनेत्री म्हणाली अपुर्वा नेमळेकर. अपुर्वा नेमळेकरला (Apurva Nemlekar)  तिच्या शेवंता या भूमिकासाठी ओळखतात. या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपुर्वा आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करण्यासाठी बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर अपुर्वाच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. नेहमीच सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत गप्पा मारणाऱ्या आणि आनंदाचे क्षण शेअर करणाऱ्या अपुर्वानं आता एक दु:खद बातमी शेअर केली आहे. अपुर्वाच्या भावाचे निधन झाल्याचं तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपुर्वानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अपुर्वानं तिच्या भावासोबतचे 4 फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अपुर्वानं कॅप्शन दिलं की 'प्रिय लाडक्या भावा ओमी, आयुष्यात कधी कधी नुकसान, तोटा होत असतो. यात आपण काहीही बदल करु शकत नाही. पण तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. खरं सागूं तर मी तुला निरोप द्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायलाही तयार नव्हते. तुझा एक दिवस किंवा एका सेकंदसाठी मी काहीही द्यायला तयार होते. पण मृत्यूबद्दलचं एक सत्य म्हणजे, प्रेम कधीच मरत नाही, म्हणून मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे. काही नातेसंबंध हे कधीच तोडता येत नाही.'



पुढे अपुर्वा म्हणाली, 'जरी तू शरीरानं इथं नाही परंतु माझ्या मनात, हृदयात तू कायम असशील. तुझ्या आठवणी मी माझ्या हृदयात कायमस्वरुपी जपून ठेवीन. त्या आठवणींमधून तू माझ्यासाठी जिवंत असशील. आपण पुन्हा एकदा एक दिवस नक्कीच भेटू आणि त्यानंतर आपण कधीच लांब जाणार नाही. तो पर्यंत तू माझ्यासोबत असशील. तुझ्या आठवणी माझ्यासोबत कायम असतील. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं... आणि आहे आणि कायम असेल... तू कायम स्वरूपी माझ्या मनात आणि विचारांमध्ये राहशील. माझ्या लाडक्या लहाणभावा आपण लवकरच भेटू...'


हेही वाचा : Shaakuntalam Box Office Day 1 Collection : Samantha चा 'शाकुंतलम' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला


दरम्यान, अपुर्वानं पुढे एक कमेंट करत तो 28 वर्षांचा होता. तर तिच्या लहान भावाचे निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं तिनं सांगितलं. अपुर्वाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत तिच्या दु: खात असल्याचे सांगितले. अपुर्वानंही पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कॉमेन्ट करत तिच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.