AR Rahman Issued Legal Notice : लोकप्रिय गायक आणि म्युजिशियन एआर रहमानचं खासगी आयुष्य हे गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. त्याचं कारण त्याचं आणि त्याची पत्नी सायरा बानोसोबतचा घटस्फोट आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 29 वर्षांचा लग्न मोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्याविषयी अनेक गोष्टींची चर्चा सुरु झाली. आता त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं बदनामी करणाऱ्यांना नोटिस बजावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एआर रहमाननं त्याची बदनामी करणाऱ्या सगळ्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. काल 23 नोव्हेंबर शनिवारी त्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं यूट्यूब चॅनलला त्याच्या आणि त्याची बेसिस्ट मोहिनी डेच्या कथित अफेयरवर असलेले व्हिडीओ पुढच्या तासाभरात काढून टाकण्यास सांगितले आहे. 



एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होण्याचं कारण हे आहे की त्याला त्याची पत्नी सायरा बानो पासून वेगळं होण्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर काही तासात त्याची बॅंड मेबर मोहिनी डेनं देखील तिच्या पार्टनरशी वेगळं होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. 


एआर रहमाननं या सगळ्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्या आधी त्याची बॅंड मेड मोहिनी डेनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली होती. 'मला मुलाखती देण्यासाठी सतत विनंत्या केल्या जात आहेत. हे का होतंय, हे मला पूर्णपणे कळलंय, परंतु मला या मूर्खपणात रस नाही. मी आदरपूर्वक सर्व विनंत्या नाकारल्या आहेत. मला माझी एनर्जी अफवांवर वाया घालवायची नाही. कृपया माझ्या प्रायव्हसीवर आदर करा.


एआर रहमाननं घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा करत लिहिलं की 'आम्ही ग्रॅंड 30 पर्यंत पोहोचण्याची आशा केली होती. पण असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अंत असतो. तरी देखील या विभक्त होण्यातही आम्ही अर्थ शोधतोय. जरी तुकटे पुन्हा जसे होते तसे होऊ शकत नसले. तरी देखील मित्रांनो, तुमचं प्रेम आमच्यावर तसंच राहू द्या आणि या घटनेतून जाताना आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्यासाठी धन्यवाद.'


हेही वाचा : 'लग्न करणं वायफळ, धूळ आणि कचरा..'; विवाह संस्थेवर जावेद अख्तर यांचं परखड मत


दरम्यान, एआर रहमान अर्थात अल्लाह रक्खा रहमान यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं आहेत खतीना, रहीमा आणि अमीन अशी त्यांची नावं आहेत.